Sunday, April 12, 2009
Thursday, December 25, 2008
दुर्ग संर्वधन चळवळ
॥श्री॥
जय भवानी !!
किल्ले संवर्धन आराखडा.जय शिवाजी!!!
दि. २५/१२/२००८
दि. २५/१२/२००८
१) लोकसहभाग= किल्ले संवर्धन किंवा जतन करणे हे कोणा एकट्याचे किंवा फक्त शासनाचे कर्तव्य आहे, असे नव्हे तर ते सर्वांचेच आहे. त्यासाठ्यी नागरिकांनी सहकार्य करायला हवे. या कामासाठी किल्ल्यांच्या पायथ्याशी राहणारया लोंकांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी त्यांची सभा घेऊन त्यांना प्रबोधन करुन इतिहासाची माहिती देणे आवश्यक आहे. त्यांचे दुरध्वनी क्र., पत्ता आपल्याकडे घेणे त्यांना संवर्धनाची माहिती देणे, त्यांच्याकडुन कामे करुन घेणे.
२) दिशादर्शक / एतिहासिक माहिती / वळण व घाट रस्त्यांचे फलक:
गडावरुन काय काय पहावयासं मिळते ह्या बाबत तेथिल स्थानिक लोकांशी चर्चा करुन फलक लावणे.
मोठमोठ्या राष्ट्रीय, राज्य महामार्गावर, किल्ल्याकडे जाणारा दिशादर्शक फलक लावणे, किल्ल्यांपर्यंत जाणारा रस्ता दाखवणारा फलक, रेडियम स्टिकरसह लावावा, त्यावर किती कि.मि. किल्ल्या पर्यंतचा रस्ता आहे याचा उल्लेख असावा.
प्रत्येक किल्ल्यावर काय इतिहास घडला याबाबत उल्लेख असेल असा फलक असावा, जेणेकरुन गडाचा इतिहास सर्व लोकांसमोर पोहचेल.
काही किल्ल्यांवर जाण्यासाठी तसेच किल्ल्यांपर्यंत पोहचण्यासाठी अवघड वळणे / घाट रस्ते असल्याने तश्या जागेंवर "वळण/नो-ओर्व्हटेक" असे फलक लावण्यासाठी पी.डब्ल्यु. डि. / वन /पं. स. खाते यांचेकडुन मदत घ्यावी.
मुख्य म्हणजे किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी तेथे मांसाहार- मद्यपान- धुम्रपान न करण्याबाबत फलक प्रतेक गडांवर तसेच पायथ्याशी असावा.
३) रस्ता= गडकिल्ल्यांपर्यंत किंवा ठराविक टप्प्यांपर्यंत डांबरी रस्ता बनवुन घेणे. यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अश्या विविध योजनांचा उपयोग करुन घेणे.
४) वाहनतळ= गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी थांबविण्याच्या ठिकाणी वाहनतळाची सोय करावी. व त्यासाठी ग्रामस्थांना पैसे द्यावेत. वाहनतळा शेजारी पिण्याच्या पाण्याची सोय उपल्बध करुन देणे.
५) गडांवर जाण्यासाठी पाहीरया तसेच संरक्षक कठडे उभे करणे= अवघड चढणावर संरक्षक कठडे, पी.सी.सी. किंवा विटा सिमेंटचे अंथरुण रस्ता.
६) दरवाजा= गडावर गेल्यावर प्रथम दर्शनी कमानीला दरवाजा बसवावा. तो सकाळी उघडावा व रात्री बंद करावा. रात्री गडावर कोणालाही प्रवेश देऊ नये. त्यासाठी रखवालदार नेमणे.
७) वीज= शक्य असल्यास गडावर वीज व्ह्यावी. जेणे करुन गडावरील पाण्याच्या मोटारी चालतील, मंदिरात इतरत्र प्रकाश दिवे लावता येतील. गडावर वीज असल्यास मोठे दिवे / अथवा सि.एल.फ. दिवे ऎतिहासिक वास्तु जवळ/अवघड वाटेवर, मंदिरात बसवणे.
८) ध्वज / ध्वजदंड= किल्ल्यावर ध्वजदंडासाठी जागा निश्चिती करुन त्याजागी उभारणी करणे. गडावर कायम स्वरुपी ध्वज फडकवणे. त्यासाठी नित्याने ध्वज बदलणे.
९) निवास व्यवस्था= प्रतेक गडावर गेल्यावर तेथे निवास व्यवथा असणे. खासदार/आमदार फंडातुन सांस्कृतिक भवन उभे करणे.
१०) छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळा= सांस्कृतिक भवनामध्ये पुर्णाकृती पुतळा बसवणे. खर्चकरणे शक्य होत नसेल तर तैलचित्र त्या ठिकाणी घडलेल्या इतिहासाचे लावावे.
११) बागकाम= गडावरिल मोकळ्या जागेचे सर्वेक्षण करुन, ल्यांड-स्केपींग करुन वृक्षारोपण, गवत, छोटी फुल झाडे लावुन सुशोभीकरण करणे. पावसाळ्यापुर्वी खड्डे तसेच पाण्याची सोय करणे.
१२) गड स्वच्छता मोहिम= गावकरयांच्या मदतीने वेळोवेळी मोहिम आखुन स्वच्छता करणे. तट-बुरुजांवरिल झाडे तोडणे. कायम स्वरुपी एक यंत्रणा उभी करणे.
१३) एतिहासिक वास्तुंची दुरुस्ती= गडकोटांची पडझड झाल्याची नोंद वहीमध्ये / छायाचित्र स्वरुपात संकलन करुन ठेवणे. किल्ला कोणत्या खात्याच्या अखात्यारित आहे, त्या अनुशंगाने त्या-त्या खात्याकडे पाठपुरवठा करुन त्याची दुरुस्ती करावी.
उ.दा. पुरातत्व खाते/ वन खाते / खाजगी इ. पडलेल्या वास्तु उभ्या करणे.
१४) पाण्याच्या टाक्या= पावसाळ्यापुर्वी गाळ काढणे, पाण्यात घाण, दगड किंवा कचरा टाकू नये, त्यासाठी फलक लावणे. ग्रा.पं.जि.प., आमदार किंवा खासदार फंड यातुन त्या टाक्या दुरुस्त करुन घेणे.
१५) स्वछतागृह / कचरा व्यवस्थापन = पर्यटकासाठी स्वछतागृह उभी करणे. पुर्वीच्या जागी किंवा नविन ठिकाणी उभी करुन पाण्याची सोय करणे. तसेच गडावर देऊळ पासुन काही अंतरावर कचरापेटी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी त्याउपल्बध करावीत. तसेच गडांवर प्लास्टिक पिशव्याना बंदी घालावी.
१६) गडावर रखवालदार= गडाची व्यवस्था, बाग काम, पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी. तसेच रात्री/सकाळी दरवाजा बंद/उघडण्याकरिता रखवालदार ठेवणे.
१७ उत्सव= शिवजयंती, दुर्गदिन इ. सारखे उत्सव साजरे करणे.
१८) वस्तुसंग्रालय= किल्ल्यावर तसेच त्याभोवती सापडणारया ऎतिहासिक वस्तू त्या-त्या गावाच्या मंदिरामध्ये अथवा संग्राहलय उभे करणे.
ह्या आराखडा अंमलबजावणी व या कार्यास सुरवात झाली असुन ह्या कामामध्ये सहभागी होण्याकरता अथवा मदतकरु इच्छीणारया तसेच देणगी देण्यासाठी लोकांनी खालील शिवभक्तांशी संर्पक साधावा.
१) योगेश फाटक : भ्रमणध्वनी क्र.: ९८२३३००७२४
२) पंडित अर्जुनवाडकर : भ्रमणध्वनी क्र.: ९८२२६७०५५८
३) निलेश वालिंबे: भ्रमणध्वनी क्र.: ९८२२८७७७६७
४) मंदार केदारी : भ्रमणध्वनी क्र.: ९७६४७४६४९१
५) राजे भोसले: भ्रमणध्वनी क्र.: ९८२३१६७०७८
६) सागर पालकर : भ्रमणध्वनी क्र.: ९४२२९८४३६३
Tuesday, January 22, 2008
मी पाहिलेली कारसेवा!!!
॥ श्री ॥
जय भवानी ॥ जय शिवाजी ॥
आजपासुन १ वर्षापुर्वी सकाळच्या माध्यमातुन श्री. राजू शेळके व बाजारवाडी ग्रामस्थांनी एक जाहीर आवाहन केले होते. दिनांक २१ जानेवारी २००७ रोजी रोहिडागडावरील रोहिडमल्ल मंदिराच्या जिर्णोधारासाठी कारसेवा बोलवण्यात आली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन सुमारे ५०० ते ६०० लोक जमा झाले होते. एकूणच सर्व लोकांमध्ये उत्साह दिसून आला.
आवाहनामध्ये मंदिर जीर्णोधारसाठी म्हणून "कारसेवा" हा शब्द वापरला गेला, पण आपल्या मनातील कारसेवेचा अर्थ आणि ह्या दिवशी आयोजीत कारसेवेत फार फरक होता. काळानुरुप जीर्ण झालेले रोहिडमल्लाचे मंदिर पुन्हा बांधून उभे करण्यासाठी बाजारवाडी ग्रामस्थांनी कारसेवा आयोजली होती. ह्यामध्ये बाजारवाडी ग्रामस्थ, भोर व जवळील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी, गडप्रेमी लोकांनी उपस्थिती दर्शविली.
ह्या कारसेवेसाठी आदल्या दिवसापासूनच बाजारवाडीमध्ये लोक दाखल झाले होते. त्यांची जेवणाची आणि राहण्याची सोय ग्रामस्थांनी अगदीच चांगल्या प्रमाणे केली होती. कारसेवेच्या दिवशी २१ जानेवारी २००७ रोजी सकाळी दूध-पोहे नाष्टा केल्यावर छोट्या स्वरुपाचा स्वागत समांरभ झाला, त्यात मान्यवरांनी भाषणे केली. त्यात एका मुलीने भाषण केले ते फारच स्फुर्ती दायक झाले. आमच्या युग-परिवर्तक संस्थेने श्री. राजू शेळके यांना एक संजीवनी माची (किल्ले राजगड) चे चित्र भेट केले. एकुण हा कार्यक्रम लांबल्याने काही लोकांनी कामासाठी निघून जाण्याची सुचना केल्यावर हा कार्यक्रम जरा लवकर आटोपण्यात आला. कार्यक्रम संपला असे घोषीत केल्यानंतर सर्व कारसेवक गडाच्या पायथ्याकडे गेले.
आमच्या (मी सक्रिय कार्यकर्ता होतो) नियोजनानुसार २० कारसेवक पायथ्याला वाळूची पोती भरायला व लगेचच असलेल्या छोट्या चढणीवर हे सामान चढविण्याकरिता ४० लोक पाहीजे होते, पण झालेला उशीर बघता जो तो वाळूने भरलेली पोती उचलून वरती जाऊ लागला. आम्ही काही स्वयंसेवकानी वेळप्रसंग जाणून योग्य ती सुचना करुन कामामध्ये सूसुत्रता आणण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात त्यांना यश आले सुद्धा.
मंदिरासाठी जमा झालेले साहित्य म्हणजे ३५०० विटा, ५० पोती सिमेंट, व १ ट्रक वाळू, ह्यातील काही प्रमाणात सामान गाढवांच्या मदतीने शक्य तितक्या उंची पर्यंत पोहचविण्यात आले होते. ह्यातील उरलेले साहित्य व अर्धवट वरती पोहचलेले साहित्य मानवी साखळीद्वारे वरती पोहचविण्यात आले. एकूणच ह्या श्रमदानामध्ये लहान मुलाचा सहभाग जाणवत होता. काही ठिकाणी २-२ ची छोटी टीम करुन एक वाळूचे पोते (१०-१५ किलो.) गडावर न्हेत होते. तर काही मुले दोन्ही खांद्यावर दोन-दोन विटा उचलून न्हेत होते. काही मुली पाणी कारसेवकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत होते. मी एका मुलीला विचारले असता ती म्हणाली मी ३ वेळा गडावरुन पाणी खालपर्यंत आणून देत आहे. त्या वेळेला मला ह्या छोट्या मुलांचे "डेडिकेशन" जाणवले. सर्व जण खूप स्फुर्तीने काम करत होते. हे सामन गडावर पोहचले सुद्धा. पण इच्छित स्थळी हे सामान चढू शकले नाही ह्याचा आम्हास खेद वाटतो.
सकाळने केलेल्या मदती बद्दल सकाळ वृत्तपत्राचे आभार. आदल्या दिवसांपासुनच्या ते दुसरया दिवसाच्या जेवणा पर्यंतची योग्य ती सोय केलेल्या बाजारवाडी ग्रामस्थांची व श्री. राजू शेळके ह्यांचेही आभार मानतो. तसेच तिथे जमलेल्या सर्व शिवप्रेमिंचे व इच्छित असुनही न येऊ शकलेल्या लोकांचे मी आभार मानतो. भविष्यकाळात अश्या कार्यक्रमास सहभागी होतील ह्याची आम्ही आशा धरतो.
मी काल म्हणजे २१ जानेवारी २००८ रोजी ह्या सर्व आठवणी उजळवुन काढण्यासाठी रोहिडा गडावर गेलो होतो. आता मंदिराची बरयाच प्रमाणात उभारणी झाली असुन फक्त छत उभारणीचे काम बाकी आहे. ह्या सोबत मी आत्ताचे तसेच १ वर्षापुर्वीचे छायाचित्र जोडत आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी हे अनुभव आपापल्या मित्र मैत्रिणिना पाठवावे. ज्याजोगे सध्याचे कामाचे स्वरुप लोकांपर्यंत पोहचेल.
Monday, August 06, 2007
१५ ऑगस्ट २००७ - मोहिम - सिंहगड
॥श्री॥
१५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन, ह्या दिवसाचे महत्व आपल्या भारतीयांना नक्किच आहे. ह्या दिवशी इंग्रज राजवटीकडुन आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण आज आपण थोडा विचार केला असता स्वातंत्र्याचा अर्थ आपण बदलवुन टाकला आहे असे दिसते.... आपण स्वतंत्र झालो पण काही गोष्टी अजुनही पारतंत्र्यामध्ये आहेत... किंबहुना आपण त्या गोष्टिंना पारतंत्र्यामध्ये ढकलत आहोत.
ह्या दिवसाच्या मुर्हुतावर आम्ही पुणे नागरिक मंच इतिहास प्रेमी गट व युग-परिवर्तकच्या सदस्यांनी असे ठरवले आहे की ह्या दिवशी सिंहगडावर येणारे गड प्रेमी जर गडावर दारु पिण्यासाठी गडाचा वापर करणार असतील तर त्यागोष्टीला आम्ही विरोध करणार आहोत. हा विरोध गांधी-गिरी पध्दतीने केला जाणार आहे.
मद्यपन करने/न करने, ही वय्यतीक बाब असली तरी ती अश्या सार्वजनिक ठिकाणी जर घडत असेल तर ती वय्यतिक ठरु शकत नाही. म्हणुन ह्या दिवशी तरी आम्ही सिंहगडाला दारु पासुन मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत...
१५ ऑगस्टच्या मुर्हुतावर आम्ही सर्व नागरिकांना असे आवाहन करत आहोत की, सिंहगडावर तसेच श्री शिव छत्रपतींच्या पायांनी पावन झालेल्या सर्व गडांवर आपण मद्यपान करु नये. तसेच ह्या दिवशी १५ ऑगस्ट २००७ रोजी आमच्या विरोध प्रर्दशनासाठी नागरिंकाचा सहभाग असावा.
श्री शिव छत्रपतींच्या स्म्रुतिला स्मरुन आपण आपला स्वातंत्र्य दिन अश्या वेगळ्याप्रकारे साजरा करुयात...
जे लोंक स्वयंसेवकाचे काम करु इच्छित असतील त्यांनी आपली नावे लवकरात लवकर कळवावी.
आपल्या सुचना आम्हास जरुर कळवा.
योगेश फाटक - yoogesh@gmail.com - ९९७००९२९८१
सुजीत शिळमकर - sujeetrshilamkar@yahoo.co.in
ओंकार भावे - onkar.bhave@gmail.com
पुणे नागरिक मंच + युग-परिवर्तक
योगेश फाटक, सुजीत शिळमकर, ओंकार भावे, रविकांत माझिरे.
Friday, April 13, 2007
Wednesday, January 10, 2007
किल्ले रोहिडा

॥श्री॥
आपण सर्वांस माहित असल्याप्रमाणे दि. २१ जानेवारी २००७ रोजी आपणास रोहिडमल्लाच्या मंदिराचा जीर्णोधार करावयचा आहे. त्यासाठी मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहुन; आपण ह्या कार्यामध्ये खारिचा वाटा उचलावा असे मी सर्वांना आवाहन करत आहे.
ज्या गडावर आपण हे कार्य करणार आहोत; त्या गडाचा इतिहास व भौगोलिक माहितीआपणांस असावी म्हणुन खालिल परिच्छेद देत आहे.
किल्ल्याची उंची : ३६६० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
अंतर : पुणे ते भोर ५० कि.मी. व भोर ते रोहिडा ७ कि.मी.
रोहिडा किल्ला हा भोरच्या दक्षिणेस ७ कि.मी. आहे. ह्या गडाला विचित्रगडकिंवा बिनिचा किल्ला असे सुधा संबोधले जाते.
इतिहास : हा किल्ला यादवकालीन असुन १६५६ नंतर हा किल्ला स्वराज्यात आला. १६६६च्या तहानुसार मोघलांच्या ताब्यात गेला. २४ जुन १६७० साली हा किल्ला शिवरायांनी परत घेतला. ह्या गडावरिल रोहिडमलाच्या मंदिराच्या जीर्णोधाराचे आवाहन केले आहे, हे आवाहन रायरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू शेळके ह्यांनी. यांच्याशी केलेल्या संवादतुन असे कळुन आले की मंदिर उभारणीसाठी एकुण २लाख रुपये लागणार आहेत. त्यापैकी ३०००० हजार जमले असुन २०००० हे गाढवाच्या मजुरीसाठी देण्यात आले आहेत. खालिल प्रमाणे सामान हे मंदिर उभारणीसाठी लागणार आहे:
१) विटा = ७००० हजार
२) वाळू = २ ट्रक
३) सिंमेट = १५० पोती (५० किलो)
४) पत्रे = टाटा कं. चे .८० मि.मि. जाडिचे ६*१० फुटी
वरिल वस्तू ह्या देऊळ रचनाकार ह्यांनी सागितल्या असुन खालीलप्रमाणे वस्तू जमवण्यात आल्या आहेत.
१) विटा = ३५०० हजार
२) सिंमेट = ७५ पोती (५० किलो)
३) वाळू = १ ट्रक
वरिल सर्व माल हा गडाच्या अर्ध्या उंची पर्यंत गाढवाच्या मदतीने पोहचवला असुन त्याचे छायाचित्र ह्या पत्रासोबत जोडत आहे. माझी आपणांस विनंती आहे कि, श्रमदानाप्रमाणे थोडिशी आर्थिक मदत सुद्धा करावी. आपण मदत चेक/रोखस्वरुपात करु शकता. त्याची रितसर पावती देण्यात येइल, असे राजू शेळके ह्यानी सांगितले आहे. केलेली मदत ही इनकम-टैक्स (८०-जी) प्रमाणे सवलतपात्र असेल. मी स्वःताहा ह्या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र व सवलतपत्र पडताळुन पहिले असुन त्याची एक प्रत माझ्याकडे आहे.
आपल्या कामाचा आराखडा खालील प्रमाणे:
१) सकाळी ६:०० वाजता जमणे.
ठिकाण: सिंहगड रस्त्यावरिल माणिकबागेजवळील पेट्रोल पंप
२) सकाळी ६.१५ ला रोहिडाला कुच करणे.
३) सकळी ८ वाजता बाजारवाडीला पोहचणे.
४) ९ वाजता नारळ फोडून कामास सुरवात करणे.
५) १० वाजता न्याहरी (ब्रेक-फ़ास्ट).
६) दुपारी १ वाजता जेवण.
७) उरलेले काम पुर्ण करणे.
सगळ्यांसाठी स्फ़ुर्तीदायक माहिती अशी की, गडावर रहाणारया १०५ वर्षाच्याबाईंच्या हस्ते नारळ फोडुन आपण सुरवात करणार असुन त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. एकुण ह्या कार्यासाठी ५०० मावळ्यांची गरज असुन ३०० (१०० मुले भोर काँलेजमधुन, २०० मुले भोर जवळिल शाळांमधुन) उपस्थित रहाणार आहेत, अजुन २०० लोकांची गरज आहे. त्यामुळे आपण जास्तित जास्त संखेने उपस्थित रहावे ही विनंती.
आपल्यासाठी नाष्टा, दुध, जेवणाची सोय ही बाजारवाडीच्या ग्रामस्थांनी केलेली आहे. आपल्यासाठी सर्व वेळ १ रुग्णवाहिका आणि डाँक्टर हजर असेल. आपण आपली उपस्थिती मला १५ जानेवारीपर्यंत कळवावी, गाडीची सोय आपण आपली करावी. गाडी नसलेल्यांनी मला अगोदर सागावे, म्हणजे त्या प्रमाणे काहितरी व्यवस्था मी करु शकेन.
!!जय हिंद!! !!जय महाराष्ट्र!!
योगेश फाटक.
भ्र.क्रं. ९८५०९ ५७००४
रोहिडमल्लाच्या मंदिराचा जीर्णोधार
।श्री।
!! जय भवानी !! !! जय शिवाजी !!
प्रिय मित्र आणि मैत्रिणिंनो,
दिनांक २१ जानेवारी २००७, रोजी रोहिडा किल्ल्यावरिल रोहिडमल्ल मंदिराच्या जीर्णोधारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
हे आवाहन ४ डिसेंबर रोजी सकाळ मार्फत करण्यात आले होते. अनेक दुर्गप्रेमी, मराठी माती आणि मराठीच्या अस्मितेच्या रक्षकांनी आपणहुन पुढे येऊन मदत केली. त्यात मंदिर उभार्णिच्यासाठी लागणारे साहित्य (वाळू, सिमेंट, विटा) पुरवण्यात आले आहे.
हे साहित्य गडाच्या निम्म्या चढणीपर्यंत बाजारवाडिच्या ग्रामस्थांनी, श्री. राजू शेळके तसेच बाजारवाडिचे सरपंच श्री. तुषार शिंदे यांच्या नेत्रुत्वाखाली पोचविले आहे. आता खरी मदत लागणार आहे ती गडमाथ्यावरती पोचविण्यासाठी.
यापुढे हे साहित्य मानवी साखळीच्या मदतीने पोचविले जाणार आहे. या कामात सहभागी होण्यासाठी २१ जानेवारी रोजी बाजारवाडी येथे जमावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. ह्या कामात सहभगी होणारय़ांची जेवणाची सोय बाजारवाडिचे ग्रामस्थ करणार आहेत.
मी स्वत: ह्या कामात माझा मीत्र, योगेश फाटक याच्यासोबत सहभागी होणार असुन, तो श्री. राजू शेळके ह्याच्या संपर्कात आहे. माझे तुम्हा सर्वांस असे आवाहन आहे की अश्या कामात आपण स्वता:हुन सहभागी व्हावे आणि आपली उपस्थिती दाखवावी.
आपण आपल्या कामातुन वेळ काढुन यावे ही नम्र विंनती...
आपली नावे मला अथवा योगेशला कळवावी, त्याप्रमाणे तो श्री. राजु शेळके यांना आपली संख्या सागू शकेल.
जय भवानी !! जय शिवराय!!
आपला,
योगेश फाटक
भ्रमणध्वनी क्र. ९८५०९ ५७००४.
!!! जय महाराष्ट्र !!!

Monday, November 20, 2006
किल्ले राजगड
॥श्री॥
!! जय भवानी जय शिवराय !!
॥ किल्ले राजगड ॥
स्वराज्याची पहिली राजधानी म्हणुन ओळखल्या जाणारा हा गड. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ साहेबांनी स्वत:च्या देखरेखी खाली हा गड बांधला. ह्या थोर व्यक्तिंनी आपल्या स्वराज्यासाठी ह्याच गडावरुन खलबते केली. प्रजेबद्दलचे व स्वराज्याबद्दलचे मनातले सर्व विचार येथुन राबवले. ह्या थोर व्यक्तिंना ह्या गडाने जेवढे जवळुन पाहिले तेवढे इतिहासाला सुद्धा माहीत नाहीत.
पण आज गडाचे पावित्र धोक्यात आले आहे आपल्यामुळे. आपल्यापैकी बरेच जण ह्या गडाचा इतिहास विसरुन, थोर लोकांची वचने विसरुन गडावर मद्यपान करतात. मद्यपान करणे हा सर्वस्वी स्वत:च्या इच्छेवर अवलंबुन असले तरी कुठे करावे ह्याचे भान सहसा कोणी ठेवत नाहीत.
ज्या कारणासाठी हा गड बांधला आणि आज कोणत्या कारणासाठी हा वापरला जात आहे. ह्या गोष्टिचा विचार करण्याची खरचं गरज आहे.
सर्व नगर पालिका आणि महानगर पालिकांना भेडसावणारा प्रश्न आहे तो कचरय़ाचा. त्यात मुख्यत्वे प्लास्टिक पिशव्यांचा. आपण जेथे राहतो तो भग स्वच्छ ठेवणे जशी आपली जवाबदारी आहे, त्याप्रमाणे आपण जिथे निवांतपणे काही क्षण घालवतो तेथे स्वच्छता राखणे आपले कर्तव्य आहे. आपण आणलेल्या सामानातिल प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या बरोबर परत नेऊन त्याची विल्हेवाट लावावी.
गडाचे पावित्र्य आणि शोभा कुठल्याही प्रमाणात कमी होणार नाही असे कार्य आपणा हातुन घडणार नाही अशी शपथ आपण घेऊयात आणि आचरणात आणुयात.
स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवण्याची जवाबदारी आता आपल्यावर आहे. तेव्हा अश्या मोहिमेत स्वत:हुन आपाणांस सामिल करुन घेऊयात.
जय भवानी!!
शिव प्रेमी, गड प्रेमी
आपला
योगेश रत्नाकर फाटक.
पुणे.
भ्रमणध्वनी क्रमांक = ९८५०९ ५७००४
-------------------------------------------------------------------------------
जर आपणापैकी कोणी अश्या स्वरुपाच्या मोहिमेत सहभागी होऊ इच्छित असेल त्यांनी आपले नाव, पत्ता भ्रमणध्वनी क्रमांक व ई-पत्र चा पत्ता मला द्यावा.
---------------------------------------------
Photo URL : http://new.photos.yahoo.com/phatakyogesh/album/576460762339605487