Sunday, April 12, 2009

आत्तापर्यंत पूर्ण करण्यात आलेले काम

किल्ले संवर्धन व विकास समिती

संघटनेतर्फे मागील पावसळ्या दरम्यान तीन सभा घेतल्या. सभेमध्ये जेष्ठ इतिहासकार श्री. निनाद बेडेकर, इतिहासतज्ञ रविंद्र यादव, मिलिंद एकबोटे, पांडुरंग बलकवडे, राजू शेळके उपस्थित होते. ह्या सभेमध्ये किल्ले संवर्धन व विकास समिती स्थापन करण्यात आली. आत्तापर्यंत ह्या समितीने खालील कामे पुर्ण केली आहेत.

१) कामाच्या स्वरुप व इतर माहितीच्या पत्रिका विविध गडांवर तसेच गावांमध्ये वाटल्या व गावकरयांशी संपर्क साधला.
२) रोहिडा (विचित्रगड) किल्ला हा एक मॉडेल म्हणुन निवडला. व संवर्धनाची सर्व कामे करण्याचे ठरविले.
३) दसरयाच्या मुर्हुतावर बाजारवाडी गावातील लोंकांनी रोहिडा किल्ल्यावर नगरसेवक श्री. बेलदरे पाटील व इतिहासतज्ञ रविंद्र यादव यांच्या उपस्थितीमध्ये संवर्धनाचे काम सुरु केले.
४) रोहिडा किल्ल्यावर एक किल्लेदार व गडी माणसाची नेमणुक केली. त्यांना गणवेश तसेच मोबाईल (भ्रमणध्वनी) दिला गेला.
५) गडावरिल दर्शनी भागातील बुरुजावरिल, तटबंदीवरिल झाडे काधण्यात आली.
६) पाहिरयावरिल झाडे-झुडपे काढण्यात आली.
७) तसेच गडावरिल झाडे-झुडपे, गवत साफ करण्यात आले. छोट्या स्वरुपात असणारया झाडांभोवती आळी करण्यात आली. सभोवतालचा परिसर मोकळा करुन झाडांना पाणी घालण्याचे काम नियमीत केले.
८) मंदिरातुन राडारोडा काढुन, आतुन कच्च्यास्वरुपाचे प्लास्टर करण्यात आले.
९) पाहिरयावरिल दगड-धोंडे तसेच माती बाजुला काढुन वाट मोकळी करण्यात आली आहे.
१०) गडावर सातत्याने काम चालू रहावे, तिथे येणारया स्वयंसेवकांसाठी व भक्त लोकांसाठी किमान ५० जणांच्या स्वयंपाक होइल अशी मोठी भाडी विकत आणुन गडावरच ठेवण्यात आली.
११) गडावर बाग कामासाठी लागणारी हत्यारे सर्व विकत घेऊन, गडावर ठेवण्यात आली आहेत.
१२) बुरुजावर वाढलेली झाडे, बांबुचे वन साफ केले असुन व तिथे अँसिड टाकण्यात आले आहे.
१३) शिवजयंतीला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराला जुन्या धाटणीचा लाकडी दरवाजा बसवण्यात आला आहे.
१४) गडावर १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यामध्ये ५० जणांचा सहभाग होता.
१५) गडावर ग्रामस्थांच्या सहयोगाने महाशिवरात्रीचा उत्सवाचा आरंभ केला. सुमारे ४० भक्तगण गडावर उपस्थित होते.
१६) गडावर वाळू, सिमेंट व इतर बांधकामाचे साहित्य नेण्यासाठी क्रेन विकत घेतली आहे. पण आर्थिक अडचणीमुळे काम बंद आहे. सध्या गाढवांच्या मदतीने २ ब्रास खडी, वाळू गडाच्या मध्यावर नेली आहे.
१७) गडावरिल सौरदिवे दुरुस्त करुन घेण्यात आले आहे.
१८) ढासळलेली सदर मोकळी करुन दगड, माती तसेच डबर वेगवेगळी केली आहे.
१९) मुख्य प्रवेश्द्वाराजवळ २ १/२ फुट उंच २० फुट लांब भिंत बांधुन घेतली आहे.
२०) गडावर गुढी-पाडव्याला गुढी उभारुन मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ह्यामध्ये स्थानिक महिलांचा सहभाग उत्साहवर्धक होता. सर्व कार्यकर्ते मिळुन सुमार १५० लोक गडावर उपस्थित होते.
२१) त्याचबरोबर २६ जानेवारी रोजी केंजळगड व सुवर्णदुर्ग किल्ल्यांवर ध्वजस्तंभ उभा करुन तिरंगा व भगवा फडकवण्यात आला.
२२) समितीचे काही सदस्य दर आठवड्याला सुवर्णदुर्गावर स्थानिक लोकांच्या मदतीने तेथिल माजलेले रान गवत काढतात. त्यासाठी पेट्रोलवर चालणारे मशीन विकत घेतलेले असुन त्याचा उपयोग मोठ्याप्रमाणात केला जातो.
२३) गडावरिल वाघजाई बुरुजावरिल तटबंदी बांधुल घेण्याचे काम चालू आहे. तेथे पाडलेली वाट तासुन घेऊन बंद करण्यात आली आहे.
२४) सध्या गडावर रहाटाच्या सहाय्याने वाळू ओढण्या करता ६०० फुट लांब दोर लावण्यात आला आहे.
२५) वरिल सर्व कामांसाठी लागणारी यंत्रणा व कामगारांचा पगार व इतर लागणारा सर्व खर्च सातत्याने चालू आहे. व तो पूर्ण केला जात आहे. हा खर्च सभासद व इतर बाहेरिल देण्ग्यांमार्फत करत आहे. प्रतेक सभासदाकडुन नोंदणी शुल्क रुपये २५० व मासिक १०० रुपये आहे. नोंदणी शुल्काचा वापर संघटनेसाठी एफ.डी. स्वरुपात ठेवला जाणार आहे. आणि मासिक शुल्कातुन कामगारांचा पगार देण्याचे ठरवण्यात आले आहे. इतर सर्व मोठे खर्च काही सभासदांकडुन व बाहेरुन देणगी स्वरुपात / ऎच्छिक स्वरुपात स्विकारले जाणार आहेत. सर्वांचे एकच मत आहे ते म्हणजे काम कायम स्वरुपात, नियमीत व स्थिरपणे चालू रहावे.

२६) काही जेष्ठ विचारवंताच्या विचाराने संघटना बाधुन घेण्याचे काम चालू आहे. सभासद नोंद करुन संघटनेची स्वत:ची ताकद वाढविणे मुख्य काम चालू आहे. ह्याचा उपयोग भविष्यकाळात खुप होणार आहे.
आपल्या ह्या संघटनेला आपणासारख्या सभासदांची गरज आहे. ज्यांना स्वता:च्या संस्कृतीचा, इतिहासाचा, आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अभिमान आहे व त्याचे विचार सत्यामध्ये उतरविण्याची प्रबळ इच्छा आहे. अश्या क्रांतिकारी सम विचारी लोकांनी आमच्या हातात हात घेऊन ह्या किल्ले संवर्धनाच्या चळवळीमध्ये उडी मारावी हे आवाहन ह्या दिवसाच्या मुहुर्तावर आपणांस करत आहोत.

विविध संघटनांचे कार्यकर्ते व कंपनीमधील कामगारांचा सहभाग:
वरिल सर्व कामांमध्ये मुख्यत्वे खालिल संघटनांचा सहभाग होता:
गणेश इंडस्ट्रिज (वारजे), अशोका इंडस्ट्रिज, वैशाली इंडस्ट्रिज , सेन्यू इंजिनिअर्स, अभिनव कॉलेजचे विद्यार्थी, गिरीदर्शनच्या सभासदांनी तट-बुरुजा वरिल झाडे तोडण्याचे मुख्य व अवघड काम पुर्ण केले. तसेच निकॉन कॉलेजचे विद्यार्थी गडाचा नकाशा काढणे व लेआऊटचे काम हाती घेतले आहे. भोरमधुन विविध कार्यकर्ते दर रविवारी गडावरिल झाडांना पाणी घालण्याचे रतिब स्वता:हुन करतात.
त्याच प्रमाणे बेळगाववरुन ४० शिवभक्त गडावर येऊन मंदिरातील २ भींतीचा प्लास्टरचे काम पुर्ण केले. पेट्रोलवर चालणारी मोटोर करवती साठी ५००० रुपये दिले. त्याचा उपयोग मोठी झुडुपे तोडण्यासाठी व तटावरिल वडाची झाडे तोडण्याकरता झाला.