Wednesday, January 10, 2007

किल्ले रोहिडा
















॥श्री॥
॥जय भवानी॥ ॥जय रोहिडेश्वर॥ ॥जय शिवराय॥

आपण सर्वांस माहित असल्याप्रमाणे दि. २१ जानेवारी २००७ रोजी आपणास रोहिडमल्लाच्या मंदिराचा जीर्णोधार करावयचा आहे. त्यासाठी मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहुन; आपण ह्या कार्यामध्ये खारिचा वाटा उचलावा असे मी सर्वांना आवाहन करत आहे.

ज्या गडावर आपण हे कार्य करणार आहोत; त्या गडाचा इतिहास व भौगोलिक माहितीआपणांस असावी म्हणुन खालिल परिच्छेद देत आहे.
किल्ल्याची उंची : ३६६० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
अंतर : पुणे ते भोर ५० कि.मी. व भोर ते रोहिडा ७ कि.मी.
रोहिडा किल्ला हा भोरच्या दक्षिणेस ७ कि.मी. आहे. ह्या गडाला विचित्रगडकिंवा बिनिचा किल्ला असे सुधा संबोधले जाते.
इतिहास : हा किल्ला यादवकालीन असुन १६५६ नंतर हा किल्ला स्वराज्यात आला. १६६६च्या तहानुसार मोघलांच्या ताब्यात गेला. २४ जुन १६७० साली हा किल्ला शिवरायांनी परत घेतला. ह्या गडावरिल रोहिडमलाच्या मंदिराच्या जीर्णोधाराचे आवाहन केले आहे, हे आवाहन रायरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू शेळके ह्यांनी. यांच्याशी केलेल्या संवादतुन असे कळुन आले की मंदिर उभारणीसाठी एकुण २लाख रुपये लागणार आहेत. त्यापैकी ३०००० हजार जमले असुन २०००० हे गाढवाच्या मजुरीसाठी देण्यात आले आहेत. खालिल प्रमाणे सामान हे मंदिर उभारणीसाठी लागणार आहे:
१) विटा = ७००० हजार
२) वाळू = २ ट्रक
३) सिंमेट = १५० पोती (५० किलो)
४) पत्रे = टाटा कं. चे .८० मि.मि. जाडिचे ६*१० फुटी
वरिल वस्तू ह्या देऊळ रचनाकार ह्यांनी सागितल्या असुन खालीलप्रमाणे वस्तू जमवण्यात आल्या आहेत.
१) विटा = ३५०० हजार
२) सिंमेट = ७५ पोती (५० किलो)
३) वाळू = १ ट्रक
वरिल सर्व माल हा गडाच्या अर्ध्या उंची पर्यंत गाढवाच्या मदतीने पोहचवला असुन त्याचे छायाचित्र ह्या पत्रासोबत जोडत आहे. माझी आपणांस विनंती आहे कि, श्रमदानाप्रमाणे थोडिशी आर्थिक मदत सुद्धा करावी. आपण मदत चेक/रोखस्वरुपात करु शकता. त्याची रितसर पावती देण्यात येइल, असे राजू शेळके ह्यानी सांगितले आहे. केलेली मदत ही इनकम-टैक्स (८०-जी) प्रमाणे सवलतपात्र असेल. मी स्वःताहा ह्या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र व सवलतपत्र पडताळुन पहिले असुन त्याची एक प्रत माझ्याकडे आहे.

आपल्या कामाचा आराखडा खालील प्रमाणे:
१) सकाळी ६:०० वाजता जमणे.
ठिकाण: सिंहगड रस्त्यावरिल माणिकबागेजवळील पेट्रोल पंप
२) सकाळी ६.१५ ला रोहिडाला कुच करणे.
३) सकळी ८ वाजता बाजारवाडीला पोहचणे.
४) ९ वाजता नारळ फोडून कामास सुरवात करणे.
५) १० वाजता न्याहरी (ब्रेक-फ़ास्ट).
६) दुपारी १ वाजता जेवण.
७) उरलेले काम पुर्ण करणे.
सगळ्यांसाठी स्फ़ुर्तीदायक माहिती अशी की, गडावर रहाणारया १०५ वर्षाच्याबाईंच्या हस्ते नारळ फोडुन आपण सुरवात करणार असुन त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. एकुण ह्या कार्यासाठी ५०० मावळ्यांची गरज असुन ३०० (१०० मुले भोर काँलेजमधुन, २०० मुले भोर जवळिल शाळांमधुन) उपस्थित रहाणार आहेत, अजुन २०० लोकांची गरज आहे. त्यामुळे आपण जास्तित जास्त संखेने उपस्थित रहावे ही विनंती.

आपल्यासाठी नाष्टा, दुध, जेवणाची सोय ही बाजारवाडीच्या ग्रामस्थांनी केलेली आहे. आपल्यासाठी सर्व वेळ १ रुग्णवाहिका आणि डाँक्टर हजर असेल. आपण आपली उपस्थिती मला १५ जानेवारीपर्यंत कळवावी, गाडीची सोय आपण आपली करावी. गाडी नसलेल्यांनी मला अगोदर सागावे, म्हणजे त्या प्रमाणे काहितरी व्यवस्था मी करु शकेन.

!!जय हिंद!! !!जय महाराष्ट्र!!
योगेश फाटक.
भ्र.क्रं. ९८५०९ ५७००४

रोहिडमल्लाच्या मंदिराचा जीर्णोधार

।श्री।
!! जय भवानी !! !! जय शिवाजी !!

प्रिय मित्र आणि मैत्रिणिंनो,

दिनांक २१ जानेवारी २००७, रोजी रोहिडा किल्ल्यावरिल रोहिडमल्ल मंदिराच्या जीर्णोधारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

हे आवाहन ४ डिसेंबर रोजी सकाळ मार्फत करण्यात आले होते. अनेक दुर्गप्रेमी, मराठी माती आणि मराठीच्या अस्मितेच्या रक्षकांनी आपणहुन पुढे येऊन मदत केली. त्यात मंदिर उभार्णिच्यासाठी लागणारे साहित्य (वाळू, सिमेंट, विटा) पुरवण्यात आले आहे.

हे साहित्य गडाच्या निम्म्या चढणीपर्यंत बाजारवाडिच्या ग्रामस्थांनी, श्री. राजू शेळके तसेच बाजारवाडिचे सरपंच श्री. तुषार शिंदे यांच्या नेत्रुत्वाखाली पोचविले आहे. आता खरी मदत लागणार आहे ती गडमाथ्यावरती पोचविण्यासाठी.
यापुढे हे साहित्य मानवी साखळीच्या मदतीने पोचविले जाणार आहे. या कामात सहभागी होण्यासाठी २१ जानेवारी रोजी बाजारवाडी येथे जमावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. ह्या कामात सहभगी होणारय़ांची जेवणाची सोय बाजारवाडिचे ग्रामस्थ करणार आहेत.

मी स्वत: ह्या कामात माझा मीत्र, योगेश फाटक याच्यासोबत सहभागी होणार असुन, तो श्री. राजू शेळके ह्याच्या संपर्कात आहे. माझे तुम्हा सर्वांस असे आवाहन आहे की अश्या कामात आपण स्वता:हुन सहभागी व्हावे आणि आपली उपस्थिती दाखवावी.
आपण आपल्या कामातुन वेळ काढुन यावे ही नम्र विंनती...
आपली नावे मला अथवा योगेशला कळवावी, त्याप्रमाणे तो श्री. राजु शेळके यांना आपली संख्या सागू शकेल.

जय भवानी !! जय शिवराय!!
आपला,
योगेश फाटक
भ्रमणध्वनी क्र. ९८५०९ ५७००४.
!!! जय महाराष्ट्र !!!